Manmad : पुरातन वृक्षावर पैसे लावण्याचा प्रकार,अंधश्रध्देपोटी पुरातन वृक्षाचा –हास : ABP Majha
मनमाड पासून काही अंतरावर असलेल्या अंकाई किल्यावर अगस्तीमुनीच मोठ मंदीर आहे.किल्ल्यावरील सपाट मौदानावरील तळ पार करुन पुढे गेले की किल्ल्यावरील शेवटच्या टोकावर पीर बाबा दर्गा दिसून येतो.यात प्रवेश केला की संपुर्ण परिसर खंडार म्हणून दृष्टीस पडतो.मात्र श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार पासून येथे अगस्तीमुनीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील अनेक भाविक येत असतात.आणि नंतर ते पीर बाबा च्या दर्शनाला जाता.या ठिकाणी अनेक वर्षा पासूनचे एक पुरातन वडाचे वटवृक्ष असून या ठिकाणी येणारे भाविक श्रध्देपोटी या झाडाच्या आत आपली मनोकामना पुर्ण व्हावी म्हणून पैसे ठोकत असतात.मात्र अंधश्रध्देपोटी या वटवृक्षाचे मोठ नुकसान झाल आहे.त्यामुळे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षां पासून येणारे ट्रकर्स पर्यावरण प्रेमी यांनी नाराजी व्यक्त केली असून अशा प्रकारे अंधश्रध्देपोटी एका पुरातन वृक्षाचा –हास होत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.