Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
सिल्लोड - सोयगाव तालुक्यांतील 24 शाळांतील मुख्याध्यापकांनी विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने संबंधित शाळेतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षणधिकारी कार्यालय यांच्याकडून वारंवार लेखी, तोंडी आदेश देऊनही शिक्षकांची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर न भरल्याने 24 शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात 8, ग्रामीण पोलीस ठाण्यात 9, अजिंठा पोलीस ठाण्यात 5 आणि फर्दापूर पोलीस ठाण्यात 2 अशा एकूण 24 मुख्याध्यापकांविरुद्ध दुपारी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील बहुतांश शाळा या अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या आहेत.
सिल्लोड शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात अनिल बन्सी पवार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिल्लोड यांच्या तक्रारीवरून सिल्लोड शहरातील अब्दुल रहीम उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख नईम, नॅशनल मराठी शाळेचे शेख गफ्फार कादर, सिल्लोड येथील नॅशनल मराठी शाळेचे गजानन निकम, अब्दालशानगर येथील नॅशनल उर्दूचे सोहेब अहेमद खान, जाकीर हुसेननगरचे नॅशनल उर्दू शाळेचे अब्दुल वाहिद खान, जयभवानीनगरमधील नॅशनल मराठीचे राजू काकडे, संत एकनाथचे दिनेश गोंगे, जमालशा कॉलनीतील नॅशनल उर्दूचे शेख राजीक अब्दुल निसार अशा सिल्लोड शहरातील आठ मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.