Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 17 डिसेंबर 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 17 डिसेंबर 2024 : ABP Majha
हेही वाचा :
'एक देश एक निवडणूक' विधेयक मंगळवारी संसदेमध्ये सादर होणार आहे. देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी आवश्यक घटनादुरुस्ती लोकसभेत मांडली जाणार आहे. यासाठी सत्ताधारी पक्षाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. एक देश एक निवडणूकच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात एकदाच निवडणूक घेण्यात आली तर त्यातून होणाऱ्या फायद्याची यादीच सध्या सत्ताधारी पक्षाकडून वाचून दाखवली जात आहे. एक देश एक निवडणुकीची अंमलबजावणी झाली तर त्यातून खर्च कमी होईल, प्रशासकीय कार्यक्षमता वाढेल असं सत्ताधारी पक्षाचे म्हणणं आहे 'वन नेशन वन इलेक्शन' विधेयक संसदेत कसे मंजूर होईल? 'वन नेशन वन इलेक्शन' लागू करण्यासाठी, घटनेत दुरुस्ती करण्यासाठी किमान सहा विधेयके मांडावी लागतील आणि सरकारला त्यासाठी संसदेत दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असेल. संसदेच्या दोन्ही सभागृहात एनडीएचे बहुमत असले तरी दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमत मिळवणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.