Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :28 जुलै 2024
Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :28 जुलै 2024
आजच्या महत्वाच्या घडामोडी
रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची दरड प्रवण क्षेत्रातील गावांना भेट, भयभीत झालेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी किशन जावळेंनी दिला आधार, यावेेळी माजी आमदार अनिकेत तटकरेेंची उपस्थिती.
नवापूर तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागाची खासदार गोवाल पाडवी यांच्याकडून पाहणी, झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे दिले आदेश.
सांगली शहरातील पूर पट्ट्यातील भागाची खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांच्याकडून पाहणी, कर्नाटकच्या पाटबंधारे मंत्र्यांशी चर्चा केल्याची विशाल पाटील यांची माहिती.
नंदुरबार बस स्थानकावर बसमध्ये जागा मिळवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत, बसच्या मागील चाकात अडकला विद्यार्थ्यांचा पाय, घटनेत विद्यार्थी थोडक्यात बचावला.
अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे गावात शेतकरी कुटुंबाला गावगुंडांकडून मारहाण, शेत जमिनीचा ताबा घेण्याच्या प्रयत्नातून मारहाण, जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू.
सोलापुरात आरोपींना दोरखंड बांधून रस्त्यावर चालवत न्यायालयामध्ये आणल्याप्रकरणी पोलिसांना स्पष्टीकरण देण्याचे न्यायालयाचे आदेश, हे प्रकरण बार्शी पोलिसांना अंगलट येण्याची शक्यता.
यवतमाळच्या उमरी गावात रोजगार हमी योजनेतून सांडपाणी वाहून नेण्यात येणाऱ्या नालीचं काम, कामासाठी छत्तीसगडमधील मजूर आणून कामही निकृष्ट दर्जाचं केल्याचा नागरिकांचा आरोप.