Maharashtra Winter Session : विधानसभेच्या अध्यक्षपदावरून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आज वादळी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी अध्यक्ष निवडीच्या नियम बदलाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला. आज पहिल्याच दिवशी अध्यक्ष निवडीच्या नियम बदलांबातचा प्रस्ताव समोर आला. आणि त्यावरील हरकती नोंदवण्यासाठी एक दिवसांची वेळ देण्यात आली होती. मात्र विरोधकांनी या नियम बदलांनाच विरोध दर्शवला. गेले साठ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रक्रीयेत बदल करणं हे लोकशाहीला धरून नाही असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. त्यावर उत्तर देताना अध्यक्षनिवडीच्या वेळी होणारा घोडेबाजार रोखण्यासाठी नियम बदल करण्यात येत असल्याचं नाना पटोले म्हणाले.. यातील घोडेबाजार या शब्दावर आक्षेप घेत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला आणि सभात्याग केला. विधानसभेच्या अध्यक्षपद निवडणूकीवर भाजपने आक्षेप घेतलाय.. विरोधकांशी कोणतीही चर्चा न करता निवडणूक जाहीर करण्यावरुन भाजपनं यावर आक्षेप घेतलाय.