Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 15 जुलै 2024: ABP Majha
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 15 जुलै 2024: ABP Majha
छगन भुजबळांनी अचानक पवारांची भेट घेतल्यानं खळबळ...आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार मुख्यमंत्र्यांशी बोलायला तयार...भेटीनंतर भुजबळांची माहिती...
विधानसभेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी अॅक्शन मोडवर, सर्वच्या सर्व २८८ जागांचा सर्वे करणार, लोकसभेत सर्व्हेवर बोट ठेवणाऱ्या भाजपला अजितदादांचं उत्तर...
आगामी विधानसभा निवडणुकीत नवाब मलिकही उमेदवार असतील, अजिदादांचं स्पष्टीकरण...जागावाटपात २०१९ राष्ट्रवादीनं जिंकलेल्या ५४ जागांवरही अजितदादा दावा करणार...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीला रवाना, राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता
मराठा आरक्षणाच्या विषयात सरकार आणि विरोधक सारखेच, मनोज जरांगेंची टीका, तर मुख्यमंत्र्यांवर एक टक्काही विश्वास नाही, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
विधान परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी दोन गट पडल्यामुळंच काँग्रेसची मतं फुटली, नार्वेकर आणि जयंत पाटलांना मतदान करण्यावरुन पडले होते दोन गट...
लोकसभा निवडणुकीनंतर आदित्य ठाकरेंचे उद्यापासून विधानसभा निहाय दौरे..लोकसभेत पराभव झालेल्या जागांवर ठाकरे गटाचं विशेष लक्ष