Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 1 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 1 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
राज्यातील सर्वच मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे. त्यानंतर, विधानसभेला इच्छुक असलेल्या पण तिकीट न मिळालेल्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत बंडाचे निशाण फडकवले आहे. विशेष म्हणजे काही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता दिसून येते. कारण, महायुती व महाविकास आघाडीतील दोन्ही घटक पक्षांनी उमेदवारी दाखल केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, मंत्री अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांच्या सिल्लोड मतदारसंघात महायुतीमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. अब्दुल सत्तार यांनी थेट रावसाहेब दानवे यांनाच इशारा दिला. त्यानंतर, रावसाहेब दानवे यांनीही अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना चक्क औरंगजेबाची उपमा त्यांना दिली आहे. दरम्यान, सिल्लोडमधून अब्दुल सत्तार शिवसेना महायुतीचे उमेदवार आहेत, तर कन्नडमधून रावसाहेब दानवे (Raosaheb Danway) यांच्या कन्या संजना जाधव याही शिवसेना महायुतीच्या उमेदवार आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच अब्दुल सत्तारांनी महायुतीत फटाके फोडून नवं आव्हान उभं केलं आहे. महायुतीत सिल्लोड विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने युतीधर्म निभावला जाईल तशीच साथ माझी कन्नड, फुलंब्री आणि भोकरदन मतदारसंघात असेल. जर सिल्लोडमध्ये महायुती धर्म पाळला नाही तर, महायुती धर्माविरोधात फटाके फोडेल, असा थेट इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. त्यानंतर, आता रावसाहेब दानवे यांनीही पलटवार केलाय.. मी अनेक वेळेस सांगतो, घाबरतो कुणाला. औरंगजेब येऊन आमच्या शिवाजी महाराजांच्या लोकांना घाबरवतो का? तू का रजाकार आहे का? कुत्ता निशाणीवर निवडून येईल म्हणतो, लोकांना गृहीत धरले आहे का, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी नाव न घेता पण थेट अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला.