Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न, महिलेची फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली नेमप्लेट तोडून घोषणाबाजी.
फडणवीसांच्या मंत्रालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव नाव उघड करण्यास पोलिसांचा नकार.
पास न काढता सचिव गेटनं महिलेनं मंत्रालयात प्रवेश मिळवल्याची माहिती, उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयाबाहेर झालेल्या या प्रकाराची पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल
तोडफोड करणाऱ्य़ा महिलेनं प्रवेश कसा केला हे ठाऊक नसणं चुकीचं. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जबाबदारी सांभाळली नाही. फडणवीसांच्या कार्यालयात महिलेने केलेल्या प्रवेशावर भरत गोगोवलेंची प्रतिक्रिया.
केंद्रीय निवडणूक आयोगाची हॉटेल ट्रायडंटमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक, खासदार अनिल देसाई, सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांची बैठकीला उपस्थिती.
राज्याची निवडणूक एका टप्प्यात घ्या, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील, आमदार शिवाजीराव गर्जे यांची मागणी.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवा, काँग्रेस शिष्टमंडळांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी, एखादा अधिकारी पदावर जास्तवेळ राहिला की तो निवडणुकीवर प्रभाव पाडू शकतो, म्हणुन त्याची तात्काळ बदली करावी अशी मागणी.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसोबत बैठक, आगामी विधानसभा निवडणुका घेण्यासंदर्भात बैठकीत चर्चा.