ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 21 July 2024
पहाटेपासून धो धो बरसणाऱ्या पावसाची मुंबईत नॉन स्टॉप बॅटिंग. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीची बोंब, पुढच्या २४ तासासाठी अलर्ट
चिपळूणमधली वशिष्ठी, खेडमधली जगबुडी आणि रत्नागिरीतल्या काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ. जगबुडीचं पुराचं पाणी खेडच्या बाजारपेठेत,
गोवा हायवेवरच्या अंजणारी पुलावरील वाहतुकीला फटका
कोल्हापुरातील पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल, जिल्ह्यातले ८४ बंधारे पाण्याखाली, तर अलमट्टीमधून विसर्ग वाढवल्याने काहीसा दिलासा
चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीला पावसानं झोडपले. अनेक रहिवासी भागात पाणी साचल्याने नागरिकांच्या संसाराचा चिखल,
शरद पवार देशातले भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार, पुण्यातून विधानसभेचं रणशिंग फुंकताना अमित शाहांचा पवारांवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाहांचा हल्लाबोेल, संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर ठाकरे बसल्याची शाहांची टीका