Maharashtra New Year Project : नवीन वर्षात राज्यात अनेक नव्या प्रकल्पांचं लोकार्पण ABP Majha
Maharashtra New Year Project : नवीन वर्षात राज्यात अनेक नव्या प्रकल्पांचं लोकार्पण ABP Majha
नवीन वर्षात राज्यात अनेक नव्या प्रकल्पांचं लोकार्पण, मिसिंग लिंक, समृद्धी महामार्गाचा उर्वरित टप्पा सुरू होणार
आजपासून सुरू झालेलं नवं वर्ष महाराष्ट्राच्या गळ्यात समृद्धी आणि विकासाची माळ घालणारेय... कारण यंदा अनेक प्रकल्पांचं उद्घाटन होऊन ते नागरिकांच्या सेवेत येणार आहेत. तर अनेक नव्या प्रकल्पांचा शुभारंभ होऊन राज्याच्या विकासाची पायाभरणी होणारेय. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प यामधील सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पामुळे एक्स्प्रेसवेवरील अमृतांजन घाटातून जावंच लागणार नाही. खालापूर टोलनाका पार केल्यावर एक उड्डाणपूल सुरू होईल. आणि हा उड्डाणपूल गाडी थेट मिसिंग लिंकवर जाईल, त्यानंतर थेट लोणावळ्यात एक्स्प्रेसवेवर पुन्हा येईल. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवासात ३० ते ४५ मिनिटांची बचत होईल. त्याचसोबत समृद्धी महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, बुलेट ट्रेनसह अनेक प्रकल्पांना गती मिळणार आहे. त्यामुळे, निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान हे सरकारचं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने वेगाच्या महामार्गावर पोहोचेल आणि महाराष्ट्राला विकासाच्या रथावर आरूढ होता येईल हे नक्की...





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
