Corona Update : महाराष्ट्रात दीड वर्षात मृत्यूचं तांडव,2020मध्ये तब्बल 1लाखांहून अधिक मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात प्रत्येक कोरोना बाधित मृत्यूची नोंद सरकारनं घेतली असल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात गेल्या दीड वर्षात आधीच्या वर्षी पेक्षा अधिक मृत्यू झाल्याचं आकडेवारीवरून दिसतंय. महाराष्ट्रातल्या गेल्या तीन वर्षांतील मृत्यूच्या आकडेवारीची तुलना केली तर गेल्या वर्षी महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव झाल्याचं चित्र समोर येतं. २०२० मध्ये वर्षभरात आधीच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १ लाख ९३९ अधिक मृत्यू झालेत. गेल्या दीड वर्षांत कोरोनामुळे भारतात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झालेत आणि पारदर्शक आकडेवारीमुळे ही संख्या समोर आल्याचा दावा सरकारकडून केला जातो. पण प्रत्यक्षात महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेली आकडेवारी सांगितली जाते त्यापेक्षा अधिक मृत्यू वर्षभरात वाढल्याचं दिसतंय. हे सगळे मृत्यू कोरोनामुळे झालेत असा दावा आम्ही करत नाही. पण ही आकडेवारी अधिक आहे हे आकडेवारीवरून स्पष्ट दिसतंय.























