Hindi Language : देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत त्रिभाषा सूत्रीसंदर्भात महत्त्वाची बैठक
एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सचिव बैठकीला उपस्थित राहतील। हिंदी भाषेला मनसे तसंच सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि साहित्यिकांनी कडाडून विरोध केला आहे आणि या पार्श्वभूमीवर सरकार आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। पहिलीपासून त्रिभाषा सूत्री अवलंबण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला तसंच जीआर काढला होता। आधी हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली होती, पण त्यानंतर अनिवार्य हा शब्द काढून टाकला. पण तिसरी भाषा शिकणं मात्र बंधनकारक आहे. अभिषेक मुठोळा आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। अभिषेक या बैठकीमध्ये कोणकोण असेल काय निर्णय होऊ शकतो शासन पातळीवर? ती त्रिभाषा सूत्री संदर्भात एकूणच मोठ्या प्रमाणात विरोध जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतो. आणि त्यामुळेच आज आज रात्री वर्षावर यासंदर्भात महत्त्वाची बैठक आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सचिव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. हिंदी भाषेला मनसे असेल किंवा मग सामाजिक कार्यकर्ते असेल किंवा मग साहित्यिकांचा आपल्याला मोठ्या प्रमाणात विरोध जो आहे तो होताना दिसतो आहे। कुठेतरी मराठी भाषा भाषेवर गदा येण्यासाठी ही त्रिभाषा सूत्री जे आहे ते आणण्यात येत असल्याचा आरोप देखील आपल्याला यामध्ये होताना दिसतो. आणि त्यामुळे एकूण सरकारची भूमिका काय हे स्पष्ट करण्यासाठी सरकारकडून आज यासंदर्भात बैठक बोलावण्यात आलेली आहे। अभिषेक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक झाली आहे। इयत्ता पहिली ते चौथी मधल्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्ती करणाऱ्या शासनाच्या निर्णयाविरोधात आज मनसेकडून जनजागृती केली जाणार आहे। प्रत्येक शाळेबाहेर जनजागृती केली जाणार असून जीआरच्या विरोधात मनसे सह्यांची मोहिम राबवणार आहे



















