Maharashtra Cabinet Expansion : खातेवाटप पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता
राज्यात शिंदे फडणवीसांचं नवं सरकार आल्यानंतर तब्बल ४० दिवसांनी राज्याला मंत्रिमंडळ मिळालं... मात्र दोन दिवसांपूर्वी शपथ घेतलेलेल राज्याचे १८ मंत्री अजूनही खात्या विनाच आहेत आणि आता हा खातेवाटप आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे... कारण शपथ घेतल्यानंतर सर्वच मंत्र्यांकडून त्यांच्या खात्यासाठी आणि बंगल्यासाठी २-३ पर्याय मागवण्यात आले आहेत... मंत्र्यांनी हे पर्याय दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्रित त्यावर निर्णय घेतील. दरम्यान चुका होऊन देऊ नका, एकमेकांना सांभाळून घ्या अशा सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नव्या मंत्र्यांना दिल्या आहेत.. तसंच आमदारांशी संवाद साधा.. त्यांची कामं करा असंही नव्या मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
महत्त्वाच्या बातम्या




















