Maharashtra Budget : अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या योजनांची EXCLUSIVE माहिती
Maharashtra Budget : अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या योजनांची EXCLUSIVE माहिती अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात मांडणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा असणार आहे. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण, मुलींचे मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा होणार आहे. दुपारी १ वाजता मंत्रिमंडळ बैठक पार पडेल, त्यानंतर दुपारी २ वाजता अर्थसंकल्प सादर केला जाईल.
आजच्या अर्थसंकल्पामधील महत्वाच्या योजनांची माहिती..
अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांच्या योजनांची छाप
आज दुपारी अजित पवार सादर करणार अर्थसंकल्प
विधानसभा निवडणुकांच्या आधीचं बजेट असल्यानं योजनांचा पाऊस
लाडकी बहिण, युवा कौशल्य, अन्नपुर्ण योजना अशा महत्वााचा योजनांचा समावेश
अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना लागू होणार..
दरवर्षी तीन सिलिंडर फ़्री मिळणार मुख्यमंत्र्याांचा मोठा निर्णय
कोण कोणत्या योजना आहेत ?
1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
उद्देश - आर्थिक, सामाजिक स्थैर्य आणि जीवनमान सुघारण्यासाठी
लाभार्थी - २१ ते ६० वयोगटातील महिला
- २,५०,००० प्रेक्षा कमी उत्पन्न
सुमारे - ३ कोटी ५० लाख महिलांना लाभ अपेक्षित
दरमहा - १५०० रुपये
2. मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना
१२ वी पास - ७००० रुपये - वार्षिक
आयटीआय डिप्लोमा - ८००० रुपये
पदविधर - ९००० रुपये
१८ ते २९ वर्षे वयोगट दरम्यान
अंदाज़े लाभार्थी -
3. अन्नपूर्णा योजना दरवर्षी तीन सिलिंडर फ़्री सर्व महिलांना लागू
4. मुख्यंमंत्री बळीराजा वीज सवलत योजना
कृषी पंपांना विनामुल्य वीज
७.५ एचपी मोटर्स आहे त्या सर्व छोट्या मध्यम शेतकऱ्यांना मोफत वीज देणार
४४ लाख शेतकऱ्यांना फायदा होईल
८.५ लाख शेतकऱ्यांना सौर पंप देणार आहेत .
एकूण - ५२ लाख ५० हजार लाभार्थी