Maharashtra Budget Buldhana : अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?
Maharashtra Budget Buldhana : अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?
हेही वाचा :
लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या राष्ट्रवादी (अजत पवार गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजपाने आतापासूनच जपून पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, महिला आणि तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी महायुतीकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मध्ये प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना लागू केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ही योजना महाराष्ट्रात लागू झाल्यास राज्याच्या तिजोरीवर वर्षाला साधारण 15 ते 20 हजार कोटी रुपयांचा भार पडेल. महाराष्ट्रात लवकरच लाडकी बहीण योजना? (Ladli Behna Yojana in Maharashtra)'लोकसत्ता' या मराठी वृत्तपत्राने याबाबतचे सविस्तर वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार राज्यातील शिंदे सरकार लवकरच 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना लागू करण्याची शक्यता आहे. राज्यातील तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. अलिकडेच राज्य सरकारने शासकीय अधिकाऱ्यांचे एक पथक मध्य प्रदेशला पाठवले होते. या पथकाद्वारे मध्य प्रदेशमधील 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचा अभ्यास करण्यात आला. ही योजना कशी राबवली जाते? त्यासाठी नेमके प्रारूप काय आहे? याचा या पथकाने अभ्यास केला आहे. त्यानंतर आता ही योजना महाराष्ट्रात प्रत्यक्ष लागू करण्यावर काम केले जात असल्याचे सांगितले जातेय. सूत्रांच्या माहितीनुसार यावेळच्या पावसाळी अधिवेशनात या योजनेची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
![Nana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही, गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/f1ec4c3168165212687dff42853bb8da1737181146941718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/30620addf4bb338f565fe4c898ce55da1737174573326718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/d98391da8205463b24a9b0fb317e9acd1737173731734718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/332ae2a851131a6acb6c9751b5e206af1737168509009718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHA](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/074ed347d877ae675fb3ce15443f2ceb1737167435463718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)