Lok Sabha Election : पहिल्या टप्प्याचं 19 एप्रिल रोजी मतदान, अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपणार
Lok Sabha Election : पहिल्या टप्प्याचं 19 एप्रिल रोजी मतदान, अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपणार
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. रामटेक मध्ये महाविकास आघाडी समोर दोन बंडखोर उमेदवारांमुळे मोठी अडचण झाली आहे एका बाजूला काँग्रेस नेते आणि माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलं आहे गेल्या वेळेला काँग्रेस उमेदवार म्हणून किशोर गजभिये यांना साडे चार लाख मतं मिळाली होती... त्यामुळे त्यांची बंडखोरी काँग्रेसची डोकेदुखी वाढवू शकते दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश साखरे यांनी पण त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.. ते त्यांचा अर्ज मागे घेतात की नाही हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल...