Lok Sabha Election 2024 : माढ्यातून रणजीतसिंह निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी ABP Majha
Lok Sabha Election 2024 : माढ्यातून रणजीतसिंह निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी, गडकरींच्या नावाची दुसऱ्या यादीत घोषणा
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर झालीय. भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्राच्या २० जणांसह एकूण ७२ जणांची घोषणा करण्यात आलीये. नागपूरमधून नितीन गडकरींची घोषणा झालीय. तर पंकजा मुंडे यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपलीय आणि त्यांना पक्षाने बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय. मुंबईतून गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांची तिकीटं पक्षाने कापली आहेत. उत्तर मुंबईतून पियूष गोयल यांना उमेदवारी दिलीय. तर ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेचा यांना तिकीट मिळालंय. विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भीती अखेर खरी ठरली आणि सुधीर मुनगंटीवार यांना पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. मुनगंटीवार हे चंद्रपुरातून निवडणूक लढवतील. पुण्याची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना जाहीर झालीय. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना तिकीट देण्यात आलंय. राज्यातल्या पहिल्या २० जणांच्या यादीवर नजर टाकली तर विद्यमान 5 खासदारांची तिकीटं पक्षाने कापली आहेत. २० जणांच्या पहिल्या यादीत ५ महिलांना पक्षाने तिकीट दिलंय.