Kolhapur : दिव्यांगासाठी आलेल्या साहित्याचं पुराच्या पाण्यात नुकसान, करवीर पंचायत समिती म्हणते...
केंद्र सरकारकडून दिव्यांगासाठी आलेल्या साहित्याचं पुराच्या पाण्यात नुकसान झालंय. कोल्हापुरातील करवीर पंचायत समितीमध्ये हा प्रकार समोर आलाय. दोन वर्षांपूर्वी दिव्यांगांसाठी केंद्र सरकारच्या योजनेतून शेकडो जयपूर शूज वाटप न झाल्याने खराब झालेत. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे साहित्य पडून राहिल्याचा आरोप सभापतींनी केलाय. अधिकाऱ्यांच्या पगारातून साहित्याची नुकसानभरपाई घ्यावी असंही सभापतींनी म्हटलंय. तर महापुराचं पाणी इमारतीमध्ये शिरल्याने कागदपत्रं वाचवण्याला प्राधान्य दिलं असं स्पष्टीकरण बीडीओंनी दिलंय. तसंच तंत्रज्ञ उपलब्ध न झाल्याने दिव्यांगांच्या शूजचे वाटप झालं नाही असंही बीडीओंनी म्हटलंय.
या संदर्भात पंचायत समिती सभापतींनी काय आरोप केलाय आणि बीडीओंनी काय उत्तर दिलंय पाहूया...




















