Kiran Pandav : मुख्यमंत्री ओबीसींच्या ठरावाबात सकारात्मक असल्याची माहिती
Kiran Pandav : मुख्यमंत्री ओबीसींच्या ठरावाबात सकारात्मक असल्याची माहिती
ओबीसीतून मराठा आरक्षण (Maratha Reservation) देणार नाही, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अमृतसर येथील अधिवेशनात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागणी विरोधात हे महत्त्वाचे ठराव पारीत करण्यात आल्याची माहिती ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि नेते शिवसेना किरण पांडव (Kiran Pandav) यांनी दिली आहे.
पंजाबच्या अमृतसरमध्ये बुधवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महाअधिवेशन पार पडले. ओबीसी महासंघाचे हे 9 वे राष्ट्रीय अधिवेशन होते. यासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गोवा, पंजाबसहीत इतर राज्यातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महाअधिवेशनात ओबीसींच्या (OBC Reservation) विविध मागण्यांचे एकूण 30 ठराव एकमताने पारित करण्यात आले आहेत.
30 ठरावांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक
याबाबत अधिक माहिती देताना किरण पांडव म्हणाले की, ओबीसी महासंघाचे हे सर्व ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पूर्ण करणार आहेत. ओबीसींच्या अमृतसर येथील अधिवेशनात पारीत केलेल्या 30 ठरावांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारत्मक आहे, असं आश्वासन देत आमच्या पक्षात समाजा-समाजात भेदभाव नाही, जो चांगलं काम करतो त्याला पक्ष संधी देते, असे त्यांनी सांगितले आहे.