आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
Pune Crime: सोमवारी अज्ञातांनी अपहरण करून खून करण्यात आल्याचे पुणे शहर पोलिसांनी माहिती दिली.
Pune Crime: पुण्यात भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ(Satish Wagh Murder) यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट हाती लागली आहे. अपहरण करत खून झालेल्या आमदार योगेश टिळेकर यांच्या अपहरण झालेले मामा सतीश वाघ यांचा मृतदेह सापडल्यानंतर आता ही हत्या लाकडी दांडक्याने मारून करण्यात आली असल्याचं समोर येत आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतीश वाघ यांचं चौघांनी अपहरण झालं होतं.मांजरा परिसरात ही घटना घडली घडली होती. यवत गावच्या हद्दीत मृतदेह सापडल्यानंतर मृतदेहाशेजारी लाकडी दांडका पोलिसांना अढळून आला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यु नक्की कशाने झाला आहे ते समजेल असे पोलिसांनी सांगितले.
सोमवारी अज्ञातांनी अपहरण करून खून करण्यात आल्याचे पुणे शहर पोलिसांनी माहिती दिली. मांजरी येथील फुरसुंगी फाट्याजवळ संध्याकाळी फिरण्यासाठी बाहेर आलेल्या काही लोकांना मृतदेह दिसल्यानं मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या मृतदेहाजवळ लाकडी दांडका आढळुन आला असून सकाळी अपहरण केल्यानंतर लगेचच त्यांची हत्या केली असल्याचे दिसत आहे.पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,संध्याकाळी फिरण्यासाठी आलेल्या काही लोकांना हा मृतदेह दिसला. त्यानंतर लगेचच त्यांनी यवत पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. सोमवारी पहाटे अपहरण करण्यात आलेल्या सतिश वाघ यांचा मृतदेह शिंदवणे घाटात सापडला. पोलीस वाघ यांचा मृतदेह शिंदवणे घाटातून ससुन रुग्णालयात घेऊन गेले आहेत.
नक्की झाले काय?
योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ, (वय 55) नेहमीप्रमाणे आज सकाळी मांजरी येथील राहत्या घरातून मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते.. घरापासून काही अंतरावर जातात चार जणांनी त्यांना जबरदस्तीने एका चारचाकी वाहनात डांबल.. आणि काही समजण्याच्या आतच त्यांचं अपहरण केलं.. जवळच थांबलेल्या एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार पाहिला आणि वाघ कुटुंब यांना याबद्दल कळवले..पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सतीश वाघ यांचा अपहरण झाले.. अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा देखील कैद झाला.. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हाही दाखल झालाय.. या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहे.. अपहरण झालेली व्यक्ती विद्यमान आमदाराचे मामा असल्याने पोलिसांनी खास पथक तयार केली आहे..
सत्ताधारी पक्षाच्याच आमदाराचं पुण्यासारख्या शहरातून अशा प्रकारे अपहरण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे... त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.. पुण्यातील ही वाढती गुन्हेगारी कधी थांबणार असा प्रश्न भयभीत झालेले नागरिक विचारताना दिसत आहे...