Special Report Ladki Bahin Yojana :पडताळणी होणार? लाडकी बहीण छाननीच्या बंधनात?
Special Report Ladki Bahin Yojana :पडताळणी होणार? लाडकी बहीण छाननीच्या बंधनात?
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Assembly Elections 2024) एका मुद्दा तुफान गाजला. याच मुद्द्यामुळे महायुतीला विधानसभा निवडणुकांमध्ये विजय देखील मिळाला. महायुतीच्या सरकारने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) आणली. याच योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात आले. निवडणुकांच्या प्रचारामध्येही या योजनेचा जोरदार प्रचार करण्यात आला. तर विरोधकांनी मात्र या योजनेवर कडकडीत टीकास्त्रही सोडलं. निवडणुकांनंतरही याच योजनेवरुन आरोप-प्रत्यारोपांचं देणंघेणं अद्यापही सुरु आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी नुकतीच या योजनेवरुन खरमरीत पोस्ट केली आहे.