एक्स्प्लोर

Kangana Ranaut : कंगनाचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

Kangana Ranaut : कंगनाचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; नवा वाद निर्माण होण्याची शक्यता  

 

शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक हत्या अन् बलात्कार...' कंगना रणौतच्या वक्तव्याने नवा वाद  अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना राणौत आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद झाला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान अत्याचार आणि हत्या झाल्याचा आरोप तिने केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.   दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत कंगना राणौत म्हणाली की, 'आपल्या देशाचे सर्वोच्च नेतृत्व मजबूत नसते, तर या लोकांनी पंजाबला बांग्लादेश बनवले असते. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होते, ते संपूर्ण देश पाहत होता. निषेधाच्या नावाखाली हिंसाचार कसा पसरवला गेला. आंदोलनादरम्यान अनेक माणसे मारली गेली, मृतदेहांना लटकवले गेले, अत्याचार झाले...सरकारने कृषी विधेयक मागे घेताच या साऱ्यांना धक्का बसला. कारण त्यांची प्लॅनिंग खुप मोठी होती. त्यांच्यावर सरकारने वेळीच नियंत्रण मिळवले, अन्यथा ते काहीही करू शकले असते.'  पंजाबमधील वास्तव ‘उडता पंजाब’ चित्रपटातही दाखवण्यात आले आहे. सध्या पंजाबमध्ये ड्रग्ज माफिया, धर्मांतर करणाऱ्या टोळ्या आणि फुटीरतावादी खलिस्तान समर्थक फोफावत आहेत. तिथे काही लोक नेहमीच कायदा हातात घेत आहेत, हे योग्य नाही. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. माझ्यावर हल्ला करुन माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे जे काही होत आहे, ते योग्य नाही,' असे वक्तव्य कंगनाने केले आहे.  बांग्लादेशातील परिस्थितीवर बॉलिवूडमधील कुणीही भाष्य केले नाही. यावर कंगनाने म्हणते की, 'या लोकांना काहीही माहिती नसते. ते फक्त आपल्याच तंद्रीत असतात. सकाळी मेकअप करुन बसतात, देशात किंवा जगात काय चालले आहे, याने त्यांना काही फरक पडत नाही. आपले काम असेच चालू राहावे, देश नरकात गेला तरी चालेल. मात्र, देशाचे काही नुकसान झाले, तर त्यांचेही मोठे नुकसान होईल, हे ते विसरतात,' अशी तीव्र प्रतिक्रिया कंगनाने दिली.  'महिलांची सुरक्षा हा माझ्यासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. मी महिलांच्या सुरक्षेबाबत खूप गंभीर आहे आणि महिलांच्या समर्थनार्थ आवाज उठवते. मी आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' या शोमधून आयटम नंबरलाही विरोध केला होता. एखाद्या महिलेचे शरीर फक्त मनोरंजनासाठी असते का?,' असा सवालही तिने यावेळी उपस्थित केला.  दरम्यान, कंगनाने शेतकरी आंदोलनाविषयी केलेल्या वक्तव्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. पंजाब काँग्रेसचे नेते राजकुमार वेरका यांनी तर कंगना राणौतवर NSA लागू करण्याची मागणी केली आहे. वेरका म्हणाले, 'कंगना रणौत नेहमी पंजाबच्या नेत्यांबाबत गरळ ओकते. तिने शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटले, आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या आरोपांवर भारतीय जनता पक्षाने स्पष्टीकरण द्यावे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कंगनाच्या विरोधात एफआयआर नोंदवावा,' अशी मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्र व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 August 2026: आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget