Jyoti Mete Meet Sharad Pawar : लोकसभा लढवण्यास इच्छूक, ज्योती मेटेंनी घेतली शरद पवारांची भेट
Jyoti Mete Meet Sharad Pawar : लोकसभा लढवण्यास इच्छूक, ज्योती मेटेंनी घेतली शरद पवारांची भेट, शिवसंग्राम पक्षाच्या प्रमुख ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या प्रदेश कार्यालयामध्ये भेट घेतली. या भेटीमुळे बीड लोकसभेचा उमेदवार नेमका कोण असणार याबाबत अजूनही उपचारा पाळण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. या लोकसभा मतदारसंघातून ज्योती मेटे यांच्यासोबतच बजरंग बाप्पा सोनवणे हे देखील महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून बीड लोकसभेची जागा लढवण्यास इच्छुक आहेत. शरद पवार यांच्यासोबत आज दीर्घ चर्चा केल्यानंतर दोन तारखेला पुन्हा एकदा ज्योती मेटे आणि शरद पवार यांची बैठक पार पडणार आहे. ज्योती मेटे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का याबाबतचा निर्णय दोन तारखेला होणार आहे.