Rajan Teli Shiv Sena :नारायण राणेंसोबत जाणं सर्वात मोठी चूक होती,आता सेनेत परततोय,केसरकरांना हरवणार!
Rajan Teli Shiv Sena :नारायण राणेंसोबत जाणं सर्वात मोठी चूक होती,आता सेनेत परततोय,केसरकरांना हरवणार!
राजन तेलींच्या कार्यालयातून भाजपचे बॅनर हटवले, बाळासाहेब ठाकरे-उद्धव ठाकरे- आदित्य ठाकरेंचे लागले फोटो. भाजपचे सावंतवाडी मतदारसंघ प्रमुख राजन तेलीनी भाजप सदस्यत्वाचा राजिनामा दिल्यानंतर आता त्यांनी सावंतवाडीतील आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणी बॅनर हटवले आहेत. राणेंचे फोटो हटवून त्याठिकाणी आता स्व.बाबासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो कार्यालयात लावण्यात आले आहेत. त्यामुळे राजन तेली हे ठाकरे शिवसेनेत जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज संध्याकाळी त्यांचा मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे.



















