एक्स्प्लोर

दादा म्हणाले, पुण्यात अजून 3 महापालिकांची गरज, मुख्यमंत्री म्हणतात, लगेच निकड नाही, भविष्यात विचार करु!

पुण्यात राज्यातील राष्ट्राच्या प्रोजेक्टच्या संदर्भात दोन दिवसीय कार्यशाळा होत आहे. त्यामध्ये, एक महापालिका सिडको किंवा वेगवेगळी प्राधिकरण असते प्रोजेक्ट करतात त्याची कार्यशाळा आहे.

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी आज भल्या सकाळी पिंपरी चिंचवड दौरा केला. यावेळी, पाहणीदरम्यान शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढते नागरीकरणावर भाष्य करताना त्यांनी पुण्यात आणखी तीन महापालिकांची गरज व्यक्त केली. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी महापालिकांचाही उल्लेख केला. मात्र, अजित पवारांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेही पुणे (Pune) दौऱ्यावर होते, त्यांना तीन महापालिकांसंदर्भात प्रश्न विचारला असता, लगेच त्याची निकड नसल्याचं मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं. त्यामुळे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात पुण्यातील महापालिकांवरुन वेगवेगळं मत असल्याचं पाहायला मिळालं. 

पुण्यात राज्यातील राष्ट्राच्या प्रोजेक्टच्या संदर्भात दोन दिवसीय कार्यशाळा होत आहे. त्यामध्ये, एक महापालिका सिडको किंवा वेगवेगळी प्राधिकरण असते प्रोजेक्ट करतात त्याची कार्यशाळा आहे. तसेच, वेगवेगळ्या एजन्सी काम करत आहे त्याचे प्रशिक्षण आहे, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी, अजित पवारांनी पुण्यात आणखी तीन महापालिका होण्याची गरज व्यक्त केली, असा प्रश्न मुख्यमंत्र्‍यांना विचारण्यात आला . त्यावर, उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी लगेच ती निकड नसल्याचं म्हटलं. 

तीन महापालिका म्हणजे दोन ऑलरेडी आहेत, अजून एक असं तीन करा असं अजितदादांचं म्हणणं आहे. अजून तीन नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा दोन मनपा आहेत, अजून एक महापालिका करा अशी चर्चा बऱ्याच दिवसापासून आहे. आता तरी PMRD केल्यामुळे कदाचित त्याची लगेच निकड आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल. पण भविष्यात ज्याप्रकारचं शहरीकरण पुण्यात होतंय, भविष्यात कधीतरी आपल्याला हा विचार करावाच लागेल, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडले.

अजित पवारांकडून पुण्यात तीन महापालिकांची गरज व्यक्त 

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक आणि परिसराची पाहणी केली. पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी नित्याची असते. याचं चौकातून चाकण एमआयडीसीमध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं. या एमआयडीसीमध्ये 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळे या परिसरात रोज लाखभर वाहनं ये-जा करतात. त्यामुळं या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे. यावेळी चाकणला स्वतंत्र महानगरपालिका होणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड त्यानंतर वाकवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी या सर्व भागांमध्ये एक महानगरपालिका करावी लागेल, फुरसुंगी, उरुळी देवाची, तो सर्व परिसर एक महानगरपालिका नदी ओलांडून इकडे आलो पिंपरी चिंचवड मधनं तर बाकीच्या भागांमध्ये एक महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला हिंजवडी आणि जो सर्व वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल, असे अजित पवार यांनी म्हटले.  

हेही वाचा

रुपाली चाकणकरांबद्दलचा प्रश्न विचारला, रक्षा खडसेंनी हात जोडले; जळगावातील वरिष्ठ नेत्यांनाही दिला सल्ला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
Embed widget