Jalana | जालना जिल्ह्यात विजेचा शॉक लागून तीन सख्ख्या भावांचा मृत्यू
विद्युत शॉक लागून तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव पिंपळे येथे घडली आहे. ज्ञानेश्वर अप्पासाहेब जाधव, रामेश्वर अप्पासाहेब जाधव आणि सुनिल अप्पासाहेब जाधव अशी तिघांची नावं आहेत. रात्रीच्या वेळेला ज्ञानेश्वर हा शेतात पाणी देण्यासाठी मोटार सुरु करण्यासाठी गेला होता. मात्र त्याचवेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याला वाचवण्यासाठी दोघे भाऊ गेले असता या दोघांनाही विजेचा धक्का बसल्यानंतर ते दोघे विहिरीत पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला. आज पहाटे ही घटना उघडकीस आली. दरम्यान तिघा भावांचा एकाच वेळी दुर्देवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.





















