(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India vs Sri Lanka Asia Cup 2023 : आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेची दाणादाण ABP Majha
भारताच्या मोहम्मद सिराजनं आशिया चषकाच्या फायनलमध्ये कमाल केली. त्यानं अवघ्या १३ धावांत श्रीलंकेच्या सहा फलंदाजांना माघारी धाडलं. त्यामुळं श्रीलंकेची सोळाव्या षटकात ५० धावांत दाणादाण उडाली. त्यामुळं भारतासमोर विजयासाठी अवघं ५१ धावांचं लक्ष्य आहे. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियवरच्या या सामन्यात पावसामुळं खेळ ४० मिनिटं उशिरानं सुरु झाला. त्याआधी श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. जसप्रीत बुमरानं तिसऱ्याच चेंडूवर कुशल परेराला माघारी धाडून श्रीलंकेला पहिला धक्का दिला. मग मोहम्मद सिराजनं चौथ्या षटकात चार चेंडूंवर निसांका, समराविक्रमा, असालंका आणि डिसिल्व्हा या चौघांना माघारी धाडलं. त्यानं पुढच्या षटकात दासून शनाकाची आणि बाराव्या षटकात कुशल मेंडिसचीही विकेट काढली. मोहम्मद सिराजनं सात षटकांत १३ धावा मोजून सहा विकेट्स काढल्या.