Maharashtra Unseasonal Rain : राज्यासह देशभरात अवकाळी पावसाची शक्यता, गारपिटीचीही शक्यता
Maharashtra Unseasonal Rain : राज्यासह देशभरात अवकाळी पावसाची शक्यता, गारपिटीचीही शक्यता
महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा. आता महाराष्ट्रासह देशभरात उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. आता उन्हाळ्याची सुरुवात होत आहे. त्यातच आता महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट आहे. राज्यात काही ठिकाणी दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यात गारपीटीसह जोरदार पाऊस झाला. आता पुन्हा हवामान खात्याने आणखी दोन दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 48 तासांत पावसाची शक्यता आहे. राज्यात गेले दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. विदर्भात काही जिल्ह्यांत गारपीटीसह मुसळधार पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांचे गारपीटीसह झालेल्या या वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. आता नव्याने 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' सक्रीय झाला असून राज्यातच नाही तर संपूर्ण देशात हवामानात मोठे बदल घडून येत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.