(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IAS Pooja Khedkar Special Report : पूजा खेडकरच्या आयएएस प्रमाणपत्रासाठी घटस्फोटाचा बनाव?
IAS Pooja Khedkar Special Report : पूजा खेडकरच्या आयएएस प्रमाणपत्रासाठी घटस्फोटाचा बनाव?
दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा २०१० साली घटस्फोट झाल्याचे पुरावे ए बी पी माझाच्या हाती लागलेत. मात्र हा घटस्फोट फक्त नावापुरती असल्याचे पुरावेदेखील एबीपी माझाकडे आहेत. त्यामुळे दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांनी मुलगी पुजा खेडकरला ओ बी सी आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी घटस्फोटाचा बनाव रचल्याचं दिसून येतंय.))वायसीएम रुग्णालयाने पूजा खेडकरांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिलं. त्यात पूजा डाव्या गुडघ्यात कायमस्वरूपी सात टक्के अधू असल्याचं म्हटलंय. याच प्रमाणपत्राच्याआधारे पूजाने केंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं. या चौकशीला अधिक महत्व प्राप्त झालंय. कारण दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने वायसीएमच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे त्या शासकीय सेवेत रुजू झाल्यात का? अशी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळं अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या डॉक्टरांसह मदत करणाऱ्या प्रत्येकाचे धाबे दणाणलंय.