UNIVERSITY EXAMS | सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंशी चर्चा करूनच परीक्षा न घेण्याचा निर्णय - उदय सामंत
यूजीसीच्या (विद्यापीठ अनुदान आयोग) परीक्षा व शैक्षणिक कॅलेंडरच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. त्यात त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. परंतु, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी डॉ.भूषण पटवर्धन यांची मुलाखत पाहिली असून ही मुलाखत झाल्यानंतर संभ्रम निर्माण झाला असल्याचं पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
यूजीसीच्या नव्या गाइडलाइन्स आणि राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. तसेच यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करूनच परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.