(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gunratna Sadavarte सातारा पोलिसांच्या ताब्यात, काय आहे गुन्हा? ABP Majha
Gunratna Sadavarte Satara Police News : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte)यांना आता सातारा पोलिसांनी (satara police)ताब्यात घेतलं आहे. तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी त्यांच्याविरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांची सातारा पोलीस चौकशी करणार आहेत. शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर सदावर्ते यांना अटक करण्यात आली. काल त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पण आता त्यांचा ताबा सातारा पोलिसांना देण्यात आला आहे.
शरद पवारांच्या (sharad Pawar) घरावर हल्लाप्रकरणी ताब्यात असलेल्या सदावर्ते यांच्यावर दुसरीकडे साताऱ्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्य वक्तव्य केले होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना तयार झाल्या होत्या. दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.