Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांनी अनुभव सांगितला; पण निशाणा कोणावर?
Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांनी अनुभव सांगितला; पण निशाणा कोणावर?
"अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही, दहा वेळा फाईल निगेटिव्ह होऊन यायची. मात्र फॉलोअपमुळे आमचे काम झाले. दोन अडीच महिन्यात येणाऱ्या विघ्नासाठी प्रयत्न करा, स्वार्थाबरोबर परमार्थ ही करावा लागतो. आमच्या कडे लक्ष ठेवण्यासाठी लोकांनाही सांगा. ते तुम्ही न सांगता ही सांगाल याचा विश्वास आहे", असं शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले. हात पंप आणि वीज पंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी संघटनेच्या वतीने आज (दि.6) जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने जाहीर सत्कार सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. तुमची शाल मला कोणत्याच विरोधकांची थंडी वाजू देणार नाही गुलाबराव पाटील म्हणाले, तुम्ही आज माझ्या सत्कार सन्मानसाठी जी शाल दिली तिची ऊब मी कधीही विसरू शकणार नाही. तुमची शाल मला कोणत्याच विरोधकांची थंडी वाजू देणार नाही. उद्धव ठाकरे सरकारमध्ये मी पाणी पुरवठा खात मागितले नव्हते. कॅबिनेटमध्ये वर्णी लागत असल्याने मी समाधानी होतो, असं मतही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं.