Gondia Crime : गोंदियात कौटुंबिक वादातून जावयाने सासऱ्याला जाळून संपवलं ABP Majha
Gondia Crime : गोंदियात कौटुंबिक वादातून जावयाने सासऱ्याला जाळून संपवलं ABP Majha
गोंदियातील रामनगर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या सुर्याटोला येथे जावयाने आपल्या सासऱ्यासह पत्नी व मुलाला पेट्रोल घालून जाळल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे . या घटनेत देवानंद मेश्राम (52) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आरोपीची पत्नी आरती किशोर शेंडे (35) व मुलगा जय किशोर शेंडे ( 5 ) हे 90 टक्के जळाल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचाराकरीता हलविण्यात आले आहे.आरोपी जावई किशोर श्रीराम शेंडे हा घटनास्थळावरून फरार झालेला आहे.
आरोपी किशोर शेंडे यांच्यासोबत दररोज भांडण होत असल्याने व मारहाण होत असल्याने पत्नी आरती हिने सासर सोडून गेल्या वर्षभरापासून माहेरी सुर्याटोला येथे राहत होती.या दरम्यान पोटापाण्याची सोय व्हावी याकरीता एका रुग्णालयात ती नोकरी करीत होती.घटनेच्या दिवशी जेवण करुन आरोपीचे सासरे देवानंद मेश्राम हे बाहेर व पत्नी व मुलगा आत झोपले असताना आधी सासऱ्याच्या अंगावर पेट्रोल घालून आग लावली.त्यानंतर आत झोपलेल्या पत्नी व मुलाच्या अंगावरही पेट्रोल घालून आग लावून पसार झाल्याचे वृत्त आहे.याप्रकरणात रामनगर पोलिसांनी तपास सुरु केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.