(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Girish Mahajan Full PC : कोणी किती खंडण्या मागितल्या याची चौकशी झाली पाहिजे - महाजन
Girish Mahajan Full PC : कोणी किती खंडण्या मागितल्या याची चौकशी झाली पाहिजे - महाजन
हेही वाचा :
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपुरातील (Nagpur News) रेशीमबाग येथील संघ कार्यालयाला (Rashtriya Swayamsevak Sangh Headquarter) आज भेट दिली आहे. संघ कार्यालयातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आज देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे संघाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गेल्या पंधरा दिवसातली ही सलग दुसरी फडणवीसांची भेट आहे. राष्ट्रीय पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा असताना या भेटीला विशेष महत्त्व आले आहे. साधारण अर्धा तास या बैठकीत चर्चा झाल्याची ही माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सर्वत्र चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी नाव चर्चेत असताना भेटीला विशेष महत्त्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या नागपूर येथील संघ कार्यालयात नसल्याची ही माहिती पुढे आली आहे. मात्र, त्यांच्या अनुपस्थित देवेंद्र फडणवीस हे संघातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली आहे. साधारणतः अर्धा तासाच्या या भेटीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे चांगलेच सक्रिय झाले असून सध्या घडीला त्यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. त्याच अनुषंगाने गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी भेट असल्याचे देखील बोलले जात आहे. या एकंदरीत भेटी संदर्भात देवेंद्र फडणवीस हे नेमकी काय भूमिका मांडतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र आगामी निवडणूक आणि राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या नावासंदर्भात या भेटीला फार महत्त्व प्राप्त झाल्याचे देखील बोलले जात आहे.