एक्स्प्लोर
Ganeshotsav 2020 | गणपतीला कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी चौदावरून सात दिवस!
कोकणात गौरी गणपती सणाच्या निमित्ताने येणाऱ्या चाकरमानी लोकांचा क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसावरून सात दिवस करावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत दिले आहेत. तर खासदार विनायक राऊत यांनी गणेश भक्तांच्या भाविकांना तडा जाणार नाही अशी कोविड नियमावली असावी असे सुचविले.
सिंधुदुर्ग जिल्हा दक्षता शांतता समितीची बैठक सिंधुदुर्गमध्ये झाली. पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ग्राह्य धरता येणार नाही ते रद्द झाले असे समजा असे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले. गणेश चतुर्थी सणात येणाऱ्या गणेशभक्तांना सुलभ पद्धतीने ई पास मिळवता यावेत, त्यांच्या आरोग्याची तपासणी करावी, येण्यासाठी बस सुविधा करावी, महामार्गावर टोल फ्री योजना आखावी आणि मुंबई गोवा महामार्ग योग्य तिथे दुरुस्ती करावी याबाबत मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम, मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करून भूमिका ठरविली जाईल असे पालकमंत्री सामंत यांनी या बैठकीत सांगितले.

आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
करमणूक
भारत
Advertisement
Advertisement