एक्स्प्लोर
Lonar Lake Threat: '...मासे पाण्यात येणं हा पर्यावरणाला प्रचंड धोका आहे,' तज्ज्ञांचा इशारा
बुलढाण्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या (Lonar Lake) अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. हजारो वर्षांपासून क्षारयुक्त आणि अल्कधर्मी पाण्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या या सरोवरात, जिथे कोणताही सजीव जगू शकत नव्हता, तिथे आता चक्क मासे पोहताना दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते, 'अशा तऱ्हेचे मासे ह्या पाण्यात येणं हा त्या तलावाच्या पर्यावरणाला प्रचंड धोका आहे.' शहरातले सांडपाणी थेट सरोवरात मिसळल्याने आणि यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याच्या क्षारतेची पातळी (pH level) १०.५ वरून ८-९ पर्यंत घसरली आहे. यामुळे सरोवराची अद्वितीय जैवविविधता नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, सांडपाणी रोखण्यासाठी उभारलेला नीरी (NEERI) संस्थेचा प्रकल्प धूळखात पडून आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या संभाव्य यादीसाठी प्रस्तावित असलेल्या या नैसर्गिक आश्चर्याच्या संवर्धनाकडे प्रशासन आणि पर्यटन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
महाराष्ट्र
chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Anup Jalota Majha Katta : अनुप जलोटा-पंकज उदास यांची गाण्यातून सेवा, कॅन्सर पेशंटला मदत
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























