Gajanan Kirtikar : महायुतीत घटकपक्षांना सापत्न वागणूक? गजानन किर्तीकर नेमकं काय म्हणाले?
Gajanan Kirtikar : महायुतीत घटकपक्षांना सापत्न वागणूक? गजानन किर्तीकर नेमकं काय म्हणाले?
गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १३ खासदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर भाजपाबरोबर जात एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केलं. पण, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचा दावा करण्यात येत असतो.. अशातच खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. भाजपाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा दावा कीर्तिकरांनी केलाय.. एनडीएमध्ये घटकपक्षांना सापत्न वागणूक मिळतेय असं कीर्तीकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कीर्तीकर असं काहीही म्हणाले नाहीत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.





















