EXCLUSIVE Rajesh Tope : लोकल, मंदिरं, शाळा अनलॉक कधी होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे एबीपी माझावर
एप्रिल मे महिन्यात आलेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेने अवघा देश हादरला आणि याचा खुप मोठा फटका महाराष्ट्रालाही बसला. गेल्या काही दिवसांपासून आपण सगळेचजण या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय.. पण तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आपल्या डोक्यावर अजूनही कायम आहे. तिसऱ्या लाटेबद्ल आतापर्यंत अनेक अंदाज लावले गेलेत.. आणि त्याचाच परिणाम म्हणून राज्यभरात कोविडसंदर्भात लावले गेलेले निर्बंधही अजूनही उठवले गेले नाहीत. त्य़ामुळे याच निर्बंधांच्या बाबतीत अनेक प्रश्न आता महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेत. त्याच प्रश्नांची उत्तर थेट राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.





















