(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Election Commission PC : महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीची घोषणा Maharashtra Vidhan Sabha
Election Commission PC : महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीची घोषणा Maharashtra Vidhan Sabha
भारत निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र आणि झारखंड (Maharashtra Vidhansabha Election 2024) या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली आहे. भारत निवडणूक आयोगाकडून आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे, त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा शक्यता आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात आचारसंहिता लागणार आहे.
आमदारांच्या शपथविधीनंतर दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
गेल्या काही दिवसांमध्ये प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला होता. तेव्हाच विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होणार, याचे संकेत मिळाले होते. सोमवारी दुपारीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत टोलमाफीसह अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले होते. याशिवाय, आज दुपारी 12 वाजता राज्यपालनियुक्त 7 आमदारांचा विधानभवनात शपथविधी पार पडेल. यानंतर लगेच दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल आणि राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल.