Eknath Shinde : मविआ सरकारच्या कामांना स्थगिती का? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं ABP Majha
सत्तेत येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारनं घेतलेल्या अनेक निर्णयांना आणि कामांना ब्रेक लावला. मात्र या स्थगिती सत्रामुळे अधिकाऱ्यांची नाराजी आहे की काय अशी चर्चा रंगायला लागलेय.. कारण मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेल्या कामांचा राज्याचे मुख्य सचिव पुन्हा आढावा घेणार आहेत... मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिदे यांनी प्रथमच मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली... या बैठकीत कामांच्या स्थगिती बाबत चर्चा झाली.. केवळ घाईनं घेतलेल्या निर्णयांनाच स्थगिती दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मात्र स्थगिती प्रकरणं वाढली तर त्याविरोधात कोर्टातल्या याचिकाही वाढतील असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.



















