Eknath Khadse vs Anil Patil : मोदींच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून राजकीय चर्चांना उधाण
Eknath Khadse vs Anil Patil : मोदींच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून राजकीय चर्चांना उधाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत रविवारी ‘लखपती दीदीं’चा (Lakhpati Didi) मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जळगाव विमानतळ परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून आता राजकारण चांगलेच रंगले आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. वेळेत निमंत्रण असते तर मी या कार्यक्रमाला जाणार होतो. मात्र, आता निमंत्रण मिळालं तरी मी कार्यक्रमाला जाणार नाही, असे म्हटले आहे. आता यावरून मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे.
मोदींच्या कार्यक्रमाला महिला भगिनींचा प्रचंड जनसमुदाय
मंत्री अनिल पाटील यांनी जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगावमध्ये लखपती दीदी कार्यक्रमासाठी येत आहेत. याबाबत विचारले असता अनिल पाटील म्हणाले की, महिला भगिनींचा प्रचंड जनसमुदाय आज इथे पाहायला मिळत आहे. साधारण दीड लाखापर्यंत महिलांची संख्या असू शकते. महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. महिला आनंदाच्या भरात साधारण तीन ते चार किलोमीटर लांब पार्किंगपासून असूनही सभास्थळी पायी पोहोचत आहेत, असे त्यांनी यावेळी म्हटले.