एक्स्प्लोर
Shivsena Dasara Melava : पाण्याचा निचरा करणार,गवतही छाटणार; दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्क सजणार
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क सज्ज होत आहे. पक्षाकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मैदानात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मेळाव्यापूर्वी मैदानात साचलेल्या पाण्याचा निचरा केला जाणार आहे. दसरा मेळाव्याला दोन दिवस शिल्लक असताना ठाकरे गटाकडून मंडप बांधण्यासाठी आणि संपूर्ण मैदान सज्ज करण्यासाठी तयारी सुरू आहे. संपूर्ण मैदानात मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने मैदानात पाणी साचले आहे आणि गवत उगवले आहे. या सगळ्या पाण्याचा सभेपूर्वी निचरा केला जाणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मैदानात जमलेल्या गवताची छाननी करण्यास सुरुवात झाली आहे. पाण्याचा निचरादेखील केला जाणार आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे राज्य सरकारला पूरपरिस्थितीवरुन काय बोलतात, हे पाहणे महत्त्वाचे असेल.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























