Jayakwadi : मराठा आंदोलनामुळे जायकवाडीत तुर्तास पाणी सोडू नका, अधीक्षक अभियंत्याच पत्र : ABP Majha
Marathwada Water Issue : पाणी प्रश्नावरून (Water Issue) जायकवाडी (Jayakwadi Dam) उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) असा वाद पेटला असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सद्य:स्थितीत मराठा आरक्षणाचं (Maratha Reservation) आंदोलन सुरू आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची बाब विचारात घेता वरील धरणातून जायकवाडीत (Marathwada vs North Maharashtra Water Issue) पाणी सोडण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत न करण्याच्या शासनस्तरावरून सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, गोदावरी मराठवाडा (Marathwada) पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना याबाबत लेखी पत्र लिहले आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे परिणाम सर्वत्र पाहायला मिळत आहे.





















