Dhairyasheel Mohite Patil : मोहिते पाटील शरद पवारांची साथ देणार, pravin Gaikwad यांची शिष्टाई फळाला
Dhairyasheel Mohite Patil : मोहिते पाटील शरद पवारांची साथ देणार, pravin Gaikwad यांची शिष्टाई फळाला पाच वर्षांपूर्वी शरद पवारांपासून दूर गेलेलं मोहिते पाटील कुटुंब पुन्हा त्यांच्याकडे परतणार असून १३ तारखेला शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे . माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं नक्की झालंय . धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार असून धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करू नये यासाठी भाजपकडून अखेरपर्यंत प्रयत्न करण्यात आले . मात्र शरद पवारांसाठी संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांनी केलेली शिष्टाई कामाला आली आणि मोहिते पाटलांनी पुन्हा पवारांकडे परतण्याचा निर्णय घेतला . कोल्हापूरमधून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवणारे छत्रपती शाहू महाराज हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे व्याही . हे नातेसंबंध देखील माढ्यातील घडामोडींना कारणीभूत ठरले . माढ्यातील हा तिढा पवारांनी कसा सोडवला हे या सगळ्या घडामोडींचे साक्षीदार असलेल्या प्रवीण गायकवाड यांनी सांगितलंय .