PM Narendra Modi यांच्या पंजाब दौऱ्यावेळी झालेल्या प्रकरणावरून Devendra Fadnavis यांचा हल्लाबोल
पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेत त्रुटी आढळून आल्यानं देशभर खळबळ उडाली आहे आणि आता स्वतः राष्ट्रपतींनी या प्रकरणाची दखल घेतलीय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी याच मुद्यावर भेट घेतली. या बैठकीत नेमका कोणता निर्णय झाला याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.. तर दुसरीकडे पंतप्रधानाच्या सुरक्षेतील त्रुटीचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय. देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर उद्या सुनावणी होणार असल्याचं कळतंय. दरम्यान याच प्रकरणावरुन केंद्र सरकारच्या निशाण्यावर असलेल्या पंजाब सरकारनं देखील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. चौकशी करून ही समिती तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहे. काल पंजाब दौऱ्यादरम्यान आंदोलकांनी जवळपास २० मिनिटं पंतप्रधान मोदींचा ताफा पुलावर अडवून ठेवला होता. दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंजाबमध्ये घडलेल्या प्रकारावरुन चन्नी सरकारवर आगपाखड केली आहे.