Devendra Fadnavis - Ajit Pawar: आंदोलकांवरील गुन्हे गंभीर.. ते मागे घेता येत नाही : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis - Ajit Pawar : आंदोलकांवरील गुन्हे गंभीर.. ते मागे घेता येत नाही : देवेंद्र फडणवीस
मुंबई : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलेल्या 13 मागण्यांपैकी मराठा आंदोलकांवर (Maratha Reservation) आंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. यावर राज्य सरकारने अध्यादेशात गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत, असं आश्वासन देण्यात आलं होतं.
'ते' गुन्हे न्यायालयाच्या आदेशाशिवाय मागे घेता येणार नाहीत
दरम्यान, गुन्हे माघारीवरून मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतल्यानंतर आता गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devdendra Fadnavis) यांनी कोणत्या प्रकारचे गुन्हे मागे घेतले जातील? याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज (27 जानेवारी) बोलताना सांगितले की गुन्हे मागे घेण्याचा आदेश देण्यात आला आहे त्यामध्ये आंदोलनाचे गुन्हे मागे घेतले जातील. मात्र, घरे जाळणं, थेट हल्ला करणे, एसटी जाळणे हे गुन्हे न्यायालयाच्या आदेशाशिवाय मागे घेता येणार नाहीत, असे स्पष्ट केले.