एक्स्प्लोर

Devendra Fadanvis Uddhav Thackeray Meet : एका सहज भेटीचे डिटेल्स; फडणवीस-ठाकरे भेटीत काय घडलं?

Devendra Fadanvis Uddhav Thackeray Meet : एका सहज भेटीचे डिटेल्स; फडणवीस-ठाकरे भेटीत काय घडलं?

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर होत असलेले राज्य विधिमंडळाचे अधिवेशन हे सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात राजकीय घटनांचा जबरदस्त सिक्वेन्स पाहायला मिळाला. सुरुवातीला भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांमधील भेटीची चर्चा असतानाच कोणालाही अपेक्षित नसलेली आणखी एक घटना घडली. विधानभवनाच्या लिफ्टजवळ उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट झाली. यावेळी उभय नेत्यांमध्ये जुजबी चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि फडणवीस या दोघांनीही लिफ्टनेही एकत्रच प्रवास केला. त्यावेळी लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं, याचा तपशील भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी समोर आणला आहे. प्रवीण दरेकर हेदेखील उद्धव आणि फडणवीस यांच्यासोबत लिफ्टमध्ये होते.

प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राजकारणात आपण राजकीय शत्रू असू, पण सदासर्वकाळ शत्रू नसतो. लिफ्टमध्ये मी शिरत असताना सन्माननीय देवेंद्र आणि उद्धवजी आले, मिलिंद नार्वेकरही सोबत होते. आम्ही विधानपरिषदेच्या सभागृहाकडे चाललो होो. लिफ्ट सुरु झाल्यानंतर कोणीतरी बोललं, 'आपण दोघं एकत्र आहात, बरं वाटतं'. त्यावर उद्धवजी ठाकरे यांनी माझ्याकडे बोट दाखवून फडणवीसांना म्हणाले, 'याला पहिले बाहेर काढा'. तेव्हा मी बोललो की, 'तुमचं अजून समाधान झालं नाही का मी शिवसेनेतून बाहेर जाऊन. माझी बाहेर जायची तयारी आहे. तुम्ही होता का एकत्र? बोलता तसं करा'. त्यानंतर लिफ्टमध्ये हास्यविनोद झाला. उद्धवजी बोलतात तसं नाहीये, त्यांच्या पोटात एक ओठात एक, आम्ही वर गेल्यावर त्यांच्या पोटातील उत्तर मिळालं.

 त्यानंतर आम्ही लिफ्टमधून बाहेर पडलो, उद्धव ठाकरे विरोधी दिशेला गेले, आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. त्यांची मानसिकता विरोधी पक्षात राहायची आहे, ते सत्तेच्या दिशेने आले  नाहीत. आम्ही लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर आमचे वेगळे मार्ग दिसून आले आहेत, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

महाराष्ट्र व्हिडीओ

TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 30 June 2024 : 6 AM: ABP Majha
TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 30 June 2024 : 6 AM: ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 30 June 2024 : 6 AM: ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 12 AM : 30 June : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report : कसायला जमीन, पण गुंडांचे अतिक्रमण! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचे अतोनात हाल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
Majha Katta : मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
Embed widget