(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Eknath Shinde Parner : मुख्यमंत्री शिंदेंच्या आश्वासनानंतर नुकसानग्रस्त कुटुंबाला काही तासात मदत
CM Eknath Shinde Parner : मुख्यमंत्री शिंदेंच्या आश्वासनानंतर नुकसानग्रस्त कुटुंबाला काही तासात मदत
अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील वनकुटे, खडकवाडी, पळशी परिसरात तीन दिवस गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं... वनकुटेमध्ये वादळी वाऱ्यामुळे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली...दरम्यान निकष बाजूला ठेवून तातडीने निवारा द्या, पंचनामे युद्ध पातळीवर पूर्ण करा, सातबारावर नोंद नसली तरी तलाठय़ांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करावी आणि अहवाल द्यावा, मदतीपासून कोणी वंचित राहणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर लगेच सूत्र हलली... अवघ्या काही तासांत गावामध्ये पत्रे आले. तात्पुरत्या स्वरूपात उभारल्या जाणाऱ्या घरांचं काम सुरू झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द मुख्यमंत्र्यांनी अवघ्या काही तासांमध्ये पूर्ण केल्याची भावना परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जातेय.