CM Eknath Shinde on Border issue : सेवेअभावी एकही गाव महाराष्ट्राबाहेर जाणार नाही : मुख्यमंत्री
बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी एबीपी माझानं राज्यातल्या राजकर्त्यांना केलेल्या आवाहनाची... आणि माझाच्या आवाहनाची मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेल्या दखलेची.... महाराष्ट्रातली सीमेवरची गावं परराज्यात जाण्याची मागणी करु लागलीत...महाराष्ट्राच्या सीमाभागापासून ५ किलोमीटर दूर गुजरात कर्नाटक, तेलंगणातील गावांचं चित्र पाहिलं तर फरक स्पष्ट दिसतो. वीज, पाणी, पायाभूत सोयीसुविधा किंवा मग शेतमालाला भाव आणि सवलती काहीही असो, आपल्यापेक्षा कर्नाटक, गुजरात, तेलंगणा अधिक संपन्न असल्याची सीमाभागातील लोकांची भावना आहे. त्यामुळे एबीपी माझानं ही बातमी दाखवली... नांदेड, सोलापूर, सांगली, नाशिक आणि चंद्रपुरातील सीमाभागातील गावांकडे लक्ष देण्याची मागणी केली... पण आता याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली असून दुष्काळी जत तालुक्यासाठी २००० कोटींचा निधी देण्याची घोषणा केली.... सेवा मिळाल्या नाही म्हणून एकही गाव महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय.... बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष वर्धापन दिनानिमित्त वैद्यकीय सेवा सन्मान सोहळ्यात ते बोलत होते