एक्स्प्लोर

Pune Crime News : शाळेतून घरी आला, कपडे बदलून खेळायला गेला अन्..., नंतर शेतात संशयास्पद स्थितीत आढळली बॉडी, नेमकं काय घडलं?

Pune News : घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत साई मांजरे हा तळेगाव ढमढेरे येथील शाळेत शिक्षण घेत होता.

पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे साई मांजरे या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर मृत्यू हा हत्या आहे की घातपात, (Pune News) हे अद्याप स्पष्ट झाले नसून मृत्यू झालेल्या मुलाच्या डोक्यावर खोल जखम आढळून आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत साई मांजरे हा तळेगाव ढमढेरे येथील शाळेत शिक्षण घेत होता. (Pune News). घटनेनंतर मुलाचा मृतदेह घटनास्थळावरून हलविण्यात आलेला नसून पंचनामा व पुढील तपास प्रक्रिया सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रशांत  घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच वनविभागाची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून सर्व बाजूनी तपास केला जात आहे.(Pune News)

शाळेमधून घरी आला त्यानंतर कपडे बदलून खेळायला गेला

मिळालेल्या माहितीनुसार, साई मांजरे हा मुलगा शाळेमधून घरी आला त्यानंतर कपडे बदलून खेळायला गेला होता. त्यानंतर अचानक त्याचा मृतदेह शेतात सापडला. शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्तीत ही घटना घडली आहे. सदर मृत्यू हा हत्या आहे की घातपात, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या घटनेने ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले आहेत. साई हा तळेगाव ढमढेरे येथील शाळेत शिक्षण घेत होता. (Pune News)

साईचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळला, त्यावरून अनेक शंका

नेहमीप्रमाणे तो शाळेतून घरी आला. त्यानंतर कपडे बदलून तो खेळण्यासाठी शेताच्या दिशेने गेला होता. मात्र, बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने शोधाशोध सुरू झाली. अखेर शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. साईचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळला, त्यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अआहे. त्यामुळे ही हत्या असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच दहिवडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या घटनेचा पूर्ण उलगडा होत नाही आणि तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हलवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. जोपर्यंत दोषींना पकडले जात नाही, तोपर्यंत पोलीस प्रशासनाला सहकार्य करणार नसल्याची भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Maharashtra Goverment Cabinet Decision: मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
Pune Baramati Crime News: आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget